अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याच्या मनस्तापातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तिघांना पोलिस कोठडी
आत्महत्या
आत्महत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ तिच्या नातेवाईकांनी व्हायरल केल्याच्या मनस्तापातून त्या मुलीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

शहरातील अंबिका नगरात राहणार्‍या 17 वर्षीय मुलीने घरात बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ती नोट पोलिसांच्या हाती लागली.

सदर अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ तिच्या चुलत भावाने काढला होता. तोच व्हिडीओ दाखवून तिचा चुलत भाऊ तिला ब्लॅकमेल करीत होता. त्याबाबत तिने काका - काकूला माहिती दिली होती.

परंतू त्यांनी मुलीला दमदाटी केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिला मनस्ताप झाला व त्या युवतीने आत्महत्या केली.

याबाबत अब्दुल रशीद मोहम्मद जाकीर खान यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अब्दुल्ला चौधरी, सीतारा खातून, मोहम्मद ताहीर अब्दुला चौधरी, अब्दुल हमीद अब्दुल्ला व फरदीन खान हकीममुल्ला खान या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मोहम्मद चौधरी, अब्दुल हमीद चौधरी व फरदीन खान यांना अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर दोन जण फरार आहे. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com