महिला वनसंरक्षकासह तिघांना मारहाण

महिला वनसंरक्षकासह तिघांना मारहाण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील निमडाळे येथे वनविभागाच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील मेंढ्या बाहेर काढल्याच्या रागातून महिला वनरक्षकासह तिघा कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करण्यात आली. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पश्चिम देवपुर पोलिसात तिघा मेंढपाळांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत निमडाळे येथील वनरक्षक वैशाली वसंत पाटील (वय 30 रा.यशोधन कॉलनी, वलवाडी शिवार, देवपूर, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार दि.30 जुलै रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास धोंडू ठेलारी, सखाराम ठेलारी व नाना ठेलारी तिघे (रा.बुरझड ता.धुळे) वनविभागाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात मेंढ्या चारत होते. तेव्हा त्यांच्या मेंढ्या बाहेर काढण्यात आल्या.

त्या रागातुन तिघांनी वनरक्षक वैशाली पाटीलसह अजय दिलीप जाधाव, रमेश वालजी पानपाटील यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचा मोबाईल देखील हिसकावून फेकून देत शासकीय कामात अडथळा आणला.

त्यावरून वरील तिघांवर भादंवि 353,323,324, 504, 506, 34 प्रमाणे पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com