पोलिसांच्या गस्ती पथकाला धक्काबुक्की, एकाला अटक

पोलिसांच्या गस्ती पथकाला धक्काबुक्की, एकाला अटक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील मोराणे शिवारात गस्तीवरील तालुका पोलिसांच्या पथकाशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार काल रात्री घडला.

पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे फरार झाले आहेत. याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोकाँ राकेश महाले यांच्यासह कर्मचारी अवैध व्यवसायांची माहिती काढण्यासाठी काल रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास साक्री रोडवर मोराणे शिवारात गस्त घालत होते.

त्यादरम्यान एसीपीएम मेडीकल कॉलेजसमोर काही जण उभे दिसले. पथकाने त्यांना रात्री रस्त्यावर थांबण्याचे कारण विचारून हटकले. त्याचा राग येवून तुषार रावण नवले (वय 36 रा. स्टेशन रोड, धुळे), मोहन टकले (रा. धुळे), घोडा (पुर्ण नाव गाव माहित नाही) अशा तिघांनी पथकाशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

पथकाने तुषार नवले याला पकडले. तर त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी कार चालकाने मोहनसह घोडा याला कारव्दारे पळवून नेेले. पोकॉ राकेश महाले यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय विजया पवार करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com