तिघांना अटक, मोहाडीतील घरफोडीची उकल

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
तिघांना अटक, मोहाडीतील घरफोडीची उकल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मिल्लत नगरातून तिघांना अटक करत एलसीबीच्या पथकाने मोहाडी उपनगरातील घरफोडीची उकल केली आहे. त्याच्याकडून चोरीसाठी वापरल्या रिक्षासह 45 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

स्वप्निल राजेंद्र शिंदे (रा. भटाईमाता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, धुळे) यांच्या आईचे नावे असलेल्या बंगल्यात दि. 19 रोजी चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करुन दरवाज्याच्या फळ्यांचेही नुकसान केले.

याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू होता.

त्यादरम्यान हा गुन्हा आलम हमीद सय्यद (वय 25), सलीम हुसेन सय्यद (वय 32) दोघे रा.नॅशनल स्कुल, आयशा क्लिनीक जवळ, अजमेरा नगर, खडीपट्टटी, धुळे व वाजिद अय्युब शेख (वय 24, हजार खोली, मिल्लत नगर, धुळे) यांनी सोबत मिळुन केला असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने शोध घेवून तिघांना सायंकाळी हजार खोली, मिल्लत नगरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरीचा माल काढून दिला. गुन्ह्यात वापरलेली 30 हजरांची रिक्षा (क्र. एमएच 15 जे 9055) व खिडकीचे अ‍ॅल्युमिनीअमचे सेटअप असलेली चौकट, जळालेली सर्विस केबल वायर बंडल, पितळी कळी कोयंडा, स्पीकर असे 15 हजारांचे साहित्य असा एकुण 45 हजारांच मुद्येमला जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोना कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com