घरफोडी, तारांचे बंडल चोरणारी टोळी गजाआड, व्यापारीही ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 90 हजारांचा मुद्येमाल हस्तगत
घरफोडी, तारांचे बंडल चोरणारी टोळी गजाआड, व्यापारीही ताब्यात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील देवपूर परिसरात घरफोडी करणार्‍या व कुंडाणे सब स्टेशनमधून वीज तार चोरणार्‍या टोळीला एलसीबीच्या जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही व 70 हजार रुपये किंमतीची वीज तार हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान चोरट्यांकडून चोरीची वीज तार घेणार्‍या व्यापार्‍यालाही पथकाने ताब्यात घेतले आहे.

देवपुरातील इंदिरा गार्डन जवळील आनंद नगरातील प्लॉट क्र. 7 एकनाथ हाईट्समध्ये विनोद ब्रिजलाल गांगुर्डे हे राहतात. ते दि.8 रोजी कुटुंबासह नंदुरबार येथे गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्याकडे घरफोडी केली.

घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, टॅब, टिव्हीसह रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी पश्चिम देवपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास समांतर पध्दतीने एलसीबीचे पथक करीत होते.

तेव्हा ही घरफोडी वसीम उर्फ भाऊ जैनुद्दीन शेख (वय 23 रा.माधवपुरा मौलवीगंज) याने त्याच्या साथीदारांसोबत केल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने वसीम यास काल ताब्यात घेतले.

चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडू घरफोडीतील 20 हजार रुपये किंमतीचा टिव्ही हस्तगत करण्यात आला.

तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सुरेश भैय्यागिर गोसावी (वय 34), अनुराग प्रकाश पाटील (वय 25) व कैलास श्रावण पाटील (वय 24) सर्व रा.कुंडाणे (ता.धुळे) यांना काल सायंकाळी ताब्यात घेतले.

पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी कुंडाणे सबस्टेशनमधून वीज तार चोरल्याची कबुली दिली. ही तार त्यांनी वसीम आमीन शाह (रा.दिलदार नगर, मनोहर टॉकीजच्या पाठीमागे) याला विकल्याचे सांगितले.त्यालाही पथकाने ताब्यात घेवून 70 हजारांची वीज तार जप्त केली.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोहेकॉ रफीक पठाण, पोना गौतम सपकाळे, राहुल सानप, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com