चोरट्यांचा जिल्हाभरात धूमाकूळ

धुळ्यात सराफासह माजी नगरसेवकाचे घर फोडले
चोरट्यांचा जिल्हाभरात धूमाकूळ

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्याभरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. दोंडाईचातील गबाजी नगरात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी केली. एका घरातून सव्वा लाखांचा मुद्येमाल लंपास केला. तर धुळ्यातील प्रसिध्द सराफ अजय नाशिककर यांच्या स्टेशन रोड परिसरातील बंगला व माजी नगरसेवक सोनल शिंदे यांच्या घरातह चोरट्यांनी प्रवेश केला. पंरतू चोरट्यांच्या हाती विशेष असे काही लागले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शहरातील स्टेशन रोड परिसरात कादरी हॉस्पिटल जवळ सराफ अजय नाशिककर यांचा सुशिल नावाचा बंगला आहे. दर शनिवार, रविवारी ते लॉकडाऊन असल्याने कुटूंबासोबत या गेस्ट हाऊस असलेल्या बंगल्यात येतात.

काल रात्री अजय नाशिककर यांचा मोठा मुलगा अक्षय हा त्याच्या मित्रासोबत बंगल्यात आला. बंगल्यात प्रवेश करताच अक्षय यांना दोन जण बंगल्यातून पळतांना दिसले. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश करून पाहीले असता चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.

बंगल्याच्या खिडकीच्या ग्रीलचे स्क्रु काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरुमच्या कपाटातील वस्तु अस्ताव्यस्त फेकुन किंमती ऐवजचा शोध घेतला.चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी या बंगल्याजवळील माजी नगरसेवक सोनल शिंदे यांच्या जुन्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकले. देव घरातील 5 ते 7 हजार रुपये किंमतीची चांदीची मुर्ती चोरट्यांनी लंपास केली. आज सकाळी शिंदे यांच्याकडे काम करणार्‍यास घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने सोनल शिंदे यांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे हेकॉ मुक्तार मन्सुरी, पोना पंकज खैरमोडे, संदीप पाटील, पोकॉ.सचिन साळूंखे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, अविनाश कराड हे श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.श्वानाने मिलच्या गेटपर्यंत चोरट्यांचा माग दाखविला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com