वीज कार्यालयात घुसून वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

वीज कार्यालयात घुसून वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

वीज पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून कार्यालयात घुसून एकाने वरिष्ठ तंत्रज्ञास बेदम मारहाण केली. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विज वितरण कंपनीचे मोगलाई युनिटचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज सिताराम पावरा (वय 35 रा. देवपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार कल्पना राजेंद्र कोळी यांनी त्यांचे 18 हजार 915 रूपये थकीत वीज बिल भरले नाही. म्हणून त्यांची वीज जोडणी खंडीत करण्यात आली.

त्याचा राग येवून मयुर राजेंद्र जाधव (रा.रमापती चौक, मोगलाई, गवळीवाडा, साक्री रोड, धुळे) याने काल दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास नकाणे उपकेंद्र कार्यालयात घुसून मनोज पावरा यांना हाताबुक्यांनी मारहाण केली.

शर्ट फाडून नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यावरून मयुर जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम 353, 323, 427, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजया पवार करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com