मेव्हणाने केली शालकाची हत्या

जापी शिवारातील घटना, संशयिताला अटक
मेव्हणाने केली शालकाची हत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मेव्हणाने विळ्याने गळा चिरुन शालकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील जापी शिवारात कापडणे पाटचारीजवळ घडली. राजेंद्र रामसिंग बारेला (पावरा) (वय32) रा. चाळीसगाव असे मयताचे नाव आहे. तर संशयित काशिराम पावरा याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, तालुका पोलीस ठाण्याचे हेमंत पाटील व एलसीबी पथक हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावरा समाजातील केवलसिंग पावरा यांच्याकडे शनिवारी विवाह सोहळा असल्यामुळे मध्यप्रदेशातील पानसेलम तालुक्यातील हटवाडी येथे राहणारा त्यांचा जावाई काशिराम चिखल बारेला (पावरा) व इतर नातेवाईक आले होते.

विवाह सोहळा आटोपल्यानंतर रविवारी काशिराम पावरा हा आपल्या गावी परत गेला होता. मात्र काल रात्री पुन्हा तो जापी येथे आला. रात्री केवलसिंग यांच्याकडे मुक्कामाला थांबला होता. जापी येथेच केवलसिंगचा भाऊ व भाचा राहत असल्याने आज सकाळी केवलसिंगचा मुलगा व भाचा राजेंद्र रामसिंग बारेला (पावरा) हे घरातून बाहेर पडले.

लगेचच काशिरामही घरातून बाहेर पडला. राजेंद्र व त्याच्या सोबत असलेला हे दोघे जण कापडणे पाटचारीजवळून जात असतांना तेथे काशिराम आला व त्याने विळ्याने राजेंद्रच्या मानेवर व पोटावर वार केला. यामुळे राजेंद्र हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. तर त्यानंतर केवलसिंगने राजेंद्र सोबत असलेल्या मुलावरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळाल्याने बचावला.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संशयित काशिराम पावरा याचा शोध पोलिसांनी घेवून त्याला अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com