धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सुरत- नागपूर महामार्गावरील मोराणे शिवारातील भरदिवसा पिकअप वाहनाने जाणार्या पिता-पुत्राला अडवून मारहाण करण्यात आली.

त्यांना जबरीने स्कार्पिओ वाहनात बसवून त्यांच्याकडील 14 हजार रूपये रोख व मोबाईल लुटून नेला. तसेच त्यांची दोन लाख रूपये किंमतीचे पिकअप वाहनही पळवून नेले. दि. 1 रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रेम रामचंद्र मोटवानी (वय 43 रा. आनंदमंगल सोसायटी, रामनगर मागे, सुरत, गुजरात) हे मुलगा भावेश यांच्यासह दि. 1 डिसेंंबर रोजी पिकअप वाहनाने (क्र. एमएच 18 एए 4002) जात होते.

त्यादरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास इच्छापुर्ती गणपती मंदिराजवळ अचानक त्यांच्या पिकअप वाहनाला एका स्कार्पिओ वाहन (क्र. एमएच 39 सी 8836) अडवे लावून थांबविले.

स्कार्पिओतून चार अज्ञात इसम उतरले. त्यांनी मोटवानी यांच्यासह मुलगा भावेश यास मारहाण केली.

त्यांना जबरीने स्कॉर्पिओ वाहनात बसवून मोटवानी यांच्याकडील 14 हजार रूपये रोख व पाच हजारांचा मोबाईल जबरीने लुटून नेला. तसेच दोन लाख रूपये किंमतीचे पिकअप वाहन देखील पळवून नेले.

दरम्यान घटनेनंतर मोटवानी यांनी पिकअप वाहनाचा शोध घेतला. मात्र ते मिळून आल्याने त्यांनी काल धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली.

त्यानुसार अज्ञात चार इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि आर.एस. काळे हे करीत आहेत.