देवपूरात दोघांवर प्राणघातक हल्ला, 25 जणांवर गुन्हा

देवपूरात दोघांवर प्राणघातक हल्ला, 25 जणांवर गुन्हा
Crime

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

देवपुरातील विष्णु नगरात काल रात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. तलवार, कोयता लोखंडी रॉडसह 20 ते 25 जणांनी दोघा भावंडांवर हल्ला चढविला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत फरार झाले आहेत.

याबाबत राजू भारत बर्वे (वय 25 रा.विष्णू नगर, चंदन नगर व्यायाम शाळेमागे, धुळे) याने देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल रात्री विष्णू नगरातील महेंद्र कांबळे यांच्या घराजवळील रस्त्यावर साहील राजेश चित्ते याने राजूला धक्का मारला.

तेव्हा त्याने निट पाहुन चालता येत नाही का, असा सवाल केला. त्यातून साहील व राजू बर्वे यांच्यात शाब्दीक वाद झाला.

त्यानंतर रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास साहील चित्ते, राजेश मैकुलाल चित्ते, रामेश्वर मैकुलाल चित्ते, गोविंद चित्ते, तरुण चित्ते, अक्षय गोरे, हर्षल चित्ते, निखिल शिंदे, राहुल यादव, अनिमेश चत्रे आणि इतर 10 ते 15 जणांनी हातात तलवार, कोयता, लोखंंडी रॉड व लाठ्या-काठ्यांनी बबलू भारत बर्वे, अजय बर्वे या दोघा भावांना बेदम मारहाण केली. त्यात बबलूच्या डोक्यावर तलवारीचा मार लागला आहे.

संशयीतांनी त्यांच्या घरावर दगडफेक करुन खिडकीच्या काचा आणि दरवाजा फोडून नुकसान केले. याप्रकरणी वरील संशयीतांवर भादंवि कलम 307, 449, 143, 147, 148, 149, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि चंद्रकांत पाटील करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, देवपूर पोलिस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जखमीपैकी एकाला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून दुसर्‍यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com