ट्रकमधून कत्तलीसाठी नेणार्‍या 58 बैलांना जीवदान

गुदमरल्याने 6 गुरांचा मृत्यू
ट्रकमधून कत्तलीसाठी नेणार्‍या 58 बैलांना जीवदान

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

ट्रकमधून निदर्यपणे, दाटीवाटीने कत्तलीसाठी नेणार्‍या 58 बैलांना नरडाणा पोलिसांनी जिवदान दिले. तर सहा गुरांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी बैलांसह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मध्यप्रदेशच्या दोघांविरुध्द नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरडाणा पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील कलमाडी गावच्या फाट्याजवळ काल पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका ट्रकला (क्र.एम.पी.09 एच.एच.5162) पकडले.

तपासणी केली असता त्यात 8 लाख 96 हजार रुपये किंमतीचे 64 बैल आढळून आले.हे बैल कत्तलीसाठी नेले जात होते. निदर्यतेने कोंबल्याने 6 बैलांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोना डी.एस.गिरासे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक द्यालदास देविदास बैरागी (वय 35 रा.इंदिरा कॉलनी, मंदसौर) व उद्यलाल तेजमल मेघवाल (वय 24 रा.पीपलीया बाग, निमच, मध्यप्रदेश) या दोघांविरुध्द नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com