भरदिवसा महिलेची सोनपोत ओरबाडली, चौघांवर गुन्हा

भरदिवसा महिलेची सोनपोत ओरबाडली, चौघांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दुचाकीने नाशिकला जाणार्‍या दाम्पत्याला थांबवून रस्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेची 47 हजारांची सोनपोत ओरबाडून नेल्याची घटना घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सिक्युरीटी गार्ड असलेले भाऊसाहेब झुलाल पाटील (वय 56 रा. सिध्दी विनायक रो हाऊस, गट नं. 198 रूम नंबर 1, श्रमीक नगर, सातपूर, नाशिक) हे पत्नी सुशीलासह गुरूवारी दुपारी आर्वी येथून दुचाकीने (क्र. एमएच 15 8331) नाशिककडे जात होते.

त्यादरम्यान त्यांना पुरमेपाडा शिवारातील शनि मंदिराच्यापुढे हॉटेल आबा का ढाबाच्या बोर्डाजवळ मागून आलेल्या अज्ञात चौघांनी थांबविले.

रस्ता विचारण्याचा बहाणा करून सुशिला पाटील यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची पोत चोरून नेली. त्यांची किंमत 49 हजार 500 रूपये आहे. घटनेनंतर त्या घाबरून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी बरे वाटल्यानंतर काल तालुका पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास पोना ठाकुर हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com