मजुर महिलेवर सामूहिक अत्याचार, चित्रीकरण व्हायरल करून बदनामी

लामकानीतील घटना, दोन जणांवर गुन्हा
मजुर महिलेवर सामूहिक अत्याचार, चित्रीकरण व्हायरल करून बदनामी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील लामकानी येथे स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने महिलेला घरी बोलावून तिच्यावर दोघांनी जबरीने सामुहिक बलात्कार केला. अत्याचाराचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करून तिची बदनामी केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लामकानी येथील पिडीत 28 वर्षीय मजुर महिलेने सोनगीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिला गावातील अनिल धर्मा भिल याने पत्नी ही गावी गेली आहे. मला स्वयंपाक करून दे, असा बहाणा करून पिडीत महिलेला दि. 6 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरी बोलाविले.

त्यानंतर अनिलसह घरात लपून बसलेला काळु भिल (रा. बळसाणे ता. साक्री) अशा दोघांनी तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले. अनिल हा अत्याचार करीत असतांना काळु भिल त्याने व्हिडीओ काढले. त्यानंतर दोघांनी पिडीतेला याबाबत कोणास काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.

दुपारी एक वाजता काळु भिल हा पिडीतेला घरी सोडण्यास गेला. तेव्हा त्याने घरात कोणी नसल्याने तिच्यावर पुन्हा जबरीने अत्याचार केले. तसेच त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दोन्ही ठिकाणचे लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपव्दारे इतरांच्या मोबाईलमध्ये प्रसारीत करून पिडीतेची बदनामी केली.

याप्रकरणी वरील दोघांवर सोनगीर पोलिस ठाण्यात भांदवि कलम 376 (ड), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ई) 6, 7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतिष गोराडे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com