एलसीबीने अफुच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार उधळला

कुसुंबा शिवारात कारवाई; चौघांना अटक, साडेपाच लाखांचा मुद्येमाल जप्त
एलसीबीने अफुच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार उधळला

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील कुसुंबा शिवारात महामार्गावर होत असलेल्या अफुच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार एलसीबीच्या पथकाने छापा टाकत उधळला. चौघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार झाले. तसेच 5 किलो अफुसह कार, दोन दुचाकी, चार मोबाईल असा एकुण साडेपाच लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा गावातील बस स्थानक परिसरात बलदेवसिंग पन्नो हा साथीदारांसह कारमधून अफुची खरेदी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राऊत, तहसीलदार गायत्री सैदाणे यांच्यासह पथकाने काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या परिसरात शोध सुरू केला. तेव्हा तेथे गांगेश्वर फाऊंडेशसमोर महामार्गावर पुलाजवळ संशयीत कार व चार जण उभे दिसले. पथकाने छापा टाकताच दोन जण दुचाकी सोडून पसार झाले.

पथकातील काहींनी त्याचा पाठलाग केला असता एक विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच वाहनातील बलदेवसिंग चरणसिंग पन्नो (वय 50 रा. घर नं. 7 14 तरसाली, बडोदा ह.मु न्यु सतलज हॉटेल, बोरकीखडी, दहिवेल ता. साक्री), रघुनाथ भोमा राठोड (वय 35 रा. सातरपाडा ता. साक्री), ज्ञानेश्वर गोविंदा माळी (वय 50 रा. विठ्ठल मंदिराजवळ, दहिवेल) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

तर भिलाटी रमेश बागुल (रा. गुलतारा), चेतन पाटील (रा. गोताणे ता. धुळे) व चेतनचा मित्र अशी तिघा फरारींची नावे आहेत. पोलिसांनी वाहनातून पांढर्‍या रंगाच्या गोणीत भरलेली 36 हजार 50 रूपये किंमतीचे 5 किलो 150 ग्रॅम वजनाची अफुची सुकलेली बोंडे, 4 लाखांची कार (क्र एमएच 04 ईएस 1997), प्रत्येकी 40 हजारांच्या दोन दुचाकी (क्र. एमएच 18 एएफ 4637 व क्र. एमएच 19 टी 7706), 14 हजार 80 रूपये रोख, 19 हजारांचे चार मोबाईल असा एकुण 5 लाख 49 हजार 130 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोना संदीप सरग यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांवर एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा नोेंद झाला आहे. तपास उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.

ही कारवाई एलसीबीचे पोेलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि खेडकर, उपनिरीक योगेश राऊत, वळवी, हवालदार संदीप थोरात, प्रकाश सोनार, संतोष हिरे, संदीप सरग, योगेश जगताप, किशोर पाटील, प्रशांत माळे, विलास पाटील, दीपक पाटील यांनी यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com