धुळ्यात गावठी कट्टयासह दोघांना अटक

धुळ्यात गावठी कट्टयासह दोघांना अटक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मुंबई- आग्रा महामार्गावरील गुरूव्दारा समोरील पुलाखाली गावठी कट्टा, जिवंत काडतूससह मध्यप्रदेशातील ट्रकचालकासह दोघांना मोहाडी पोलिसांनी पकडले. दोघे कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात होते.

त्यांच्याकडून ट्रकसह सव्वा पाच लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूव्दारासमोरील पुलाखाली दोन जण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरू यांना मिळाली. त्यानुसार काल सायंकाळी पथकाने तेथे सापळा लावला.

एका ट्रकमधून दोघे खाली उतरून कोणाची तरी वाट बघत थांबलेले होते. संशय बळावल्याने दोघांना पकडले. त्यांची चौकशी व झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत 15 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा व 500 रूपयांचे पाच जिवंत काडतूस मिळून आले. आरीफ नवाब खान (व 32 रा. 90/1, इंदीरा नगर, ता. देवास, मध्यप्रदेश) व अब्दूल जावेद अब्दूल लतीफ शेख (वय 42 रा. 15/2, भोसले नगर, ता.देवास, मध्यप्रदेश) अशी दोघा ट्रक चालकांची नावे आहेत.

त्यांच्याकडून कट्टा, पिस्तूल व 5 लाखांचा ट्रक (क्र. एमएच 18 बीजी 7889) असा एकुण 5 लाख 15 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. पोकाँ अजय दाभाडे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सपोनि राजगुरू, पोसई एम.आय.मिर्झा, पोहेकाँ शाम काळे, पोकॉ अजय दाभाडे, चेतन माळी यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com