चितोड येथे घरफोडी ; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

दोन मोटार सायकलीही चोरट्यांनी चोरल्या, गुन्हा दाखल
चितोड येथे घरफोडी ; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या चितोड गावात घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितोड येथे जामाआप्पा गोरख नागापुरे हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. सद्या उकाडा होत असल्याने ते घराच्या स्लॅबवर कुटुंबासह झोपलेले होते. त्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला.

घरात असलेल्या कपाटातून 15 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने त्यात नथ, नेकलेस, टोंगल, पोत या दागिन्यांचा समावेश आहे. सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. तसेच घरात साहित्य अस्ताव्यस्त चोरट्यांनी फेकून पलायन केले. पहाटे चार वाजता जामाआप्पा यांना जाग आली. व ते घरात आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.

तसेच चोरट्यांनी घरातील मोटार सायकलीची चावी चोरुन मोटार सायकल सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे चोरटे मोटार सायकल तेथेच सोडून त्यांनी पलायन केले. चितोड गावाजवळ असलेल्या लिलाबाई चाळीतून चोरट्यांनी देवीदास महाजन यांची एमएच 18 एई 9575 आणि अजय सुर्यवंशी यांच्या मालकीची एमएच 18 एजी 9913 क्रमांकाची मोटार सायकल चोरुन नेल्या.

परंतू अजय सुर्यवंशी यांच्या मालकीची मोटार सायकल चितोड रोडवर असलेल्या स्मशान भूमीजवळ फेकून दिली. तर देवीदास महाजन यांच्या मालकीची मोटार सायकलीवर चोरटे पळून गेले.

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने चितोड रोडवरील पेट्रोल पंपापर्यंत माग काढला. त्यानंतर श्वानला पुढील माग गवसला नाही. असे पोलिसांनी सांगितले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com