पोलिस दलाची बदनामी, हवालदारावर गुन्हा

पोलिस दलाची बदनामी, हवालदारावर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

पोलिस व पत्रकारांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पोलिस दलाबाबत बदनामी कारक मजकुर टाकणार्‍या हवालदारावर तीन महिन्यांनंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसंत गोकुळ पाटील हे जिल्हा पोलिस दलाल हेड कॉन्टेबल पदावर कार्यरत असतांना त्यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारीचे पुर्ण भान व जाण असतांना तसेच पोलिस दलातील नियमांचे व कायद्याचे चांगल्याप्रकारे ज्ञान अवगत असतांना त्यांनी पोलिस व पत्रकारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलिस दलाची बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करून पोलिस दलाची जाणून बुजुन बदनामी केली.

दि. 22 मार्च 2021 रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोहेकाँ वसंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com