जनता हायस्कूलमधून 8 संगणक संच लंपास

जनता हायस्कूलमधून 8 संगणक संच लंपास

चिमठाणे - Chimthane - वार्ताहर :

येथील जनता हायस्कुलमधून चोरट्यांनी आठ संगणकांसह 45 हजारांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दि. 14 जुन रोजी रात्री ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी जनता हायस्कुलच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एकुण 10 मॉनिटर, 8 सीपीयु, 9 माऊस, 1 प्रोजेक्टर असे ऐकूण 45 हजारांचे साहित्य चोरून नेले.

हे संगणक साहित्य मानव विकास मिशन 2011 अंतर्गत मिळाले होते. दि. 15 रोजी सकाळी शाळेत चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत चिमठाणे पोलीस दुरक्षेत्र येथे कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

याबाबत पर्यवेक्षक सुनिल पांडुरंगा अहिरराव (वय 55 रा. चिमठाणे) यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मागील काळात परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र चोरट्यांचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com