वर्षभराच्या लढ्यानंतर अत्याचार करून तरूणीचा खून करणार्‍या चौघांवर गुन्हा

वर्षभराच्या लढ्यानंतर अत्याचार करून तरूणीचा खून करणार्‍या चौघांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील बुरझड येथील मयत तरूणीच्या नातलगांना अखेर अकरा महिन्यानतर न्याय मिळाला आहे. अचानक बेपत्ता झालेल्या तरूणीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.

याबाबत तक्रारी, पाठपुरावा केल्यानंतर तरूणीला पळवून नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून करणार्‍या चौघांवर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुरझड येथे राहणारी 19 वर्षीय तरूणी दि. 19 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर दि.20 जुलै 2020 रोजी पिडीतेच्या नातलगांनी दिलेल्या माहितीवरुन सोनगीर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दि.21 जुलै रोजी तरूणीचा मृतदेह गावातील शामराव पाटील यांच्या शेत विहिरीत आढळून आला.

याबाबत सोनगीर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पिडीतेचे नातलग तिच्या मृत्यूबाबत वारंवार संशय व्यक्त करत होते. तसेच याबाबत अपर पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. अखेर अकरा महिन्यानंतर याप्रकरणी बुरझड येथे राहणार्‍या 39 वर्षीय शेतकर्‍याची फिर्याद नोंदवून घेण्यात आली.

त्यानुसार, दि.19 जुलै 2020 रोजी 19 वर्षीय तरूणीला तात्या न्हानु व्हरकाटे, भाईदास धना दगडे, गुंता हरी बुरूगले तिघे (रा.मल्हारपाडा, सायणे ता.धुळे) व बाबुलाल नाना कोळपे (रा.बुरझड) यांनी पळवून नेले. तिच्यावर सामुहिक अत्याचार करून तिचा खून केला.

तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह बुरझड शिवारातील शामराव पाटील यांच्या शेताच्या विहिरीत फेकून दिला. त्यानुसार वरील चौघांवर भादंवि 302, 376 प्रमाणे सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि पी.व्ही. पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com