शिरपूर पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडला

शिरपूर टोल नाक्यावर कारवाई, 12 गुरांची केली सुटका
शिरपूर पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडला

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शिरपूर शहर पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी वाहतूक करणारा ट्रक पकडला. शिरपूर टोल नाक्यावरुन ट्रक ताब्यात घेऊन 12 गुरांची सुटका केली.

कत्तलीच्या उद्देशाने गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या मालट्रकवर शिरपूर शहर पोलीसांच्या पथकाने टोल नाक्यावर दि. 26 मे 2021 रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. यात 82 हजार रुपये किंमतीचे 12 गुरांची सुटका करून एकूण 5 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यप्रदेशातील इंदोर कडून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून धुळ्याच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने मालट्रक मधून गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकवर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने महामार्गावर शिरपूर टोल नाक्यावर सापळा रचून कारवाई केली.

आरजे 31 जीए 9961 क्रमांकाच्या ट्रकमध्ये पुरेशी जागा नसतांना तसेच त्यांना हालचाल करण्यास अडचण येत असतांना त्यांना अखंड दोरीने बांधलेल्या अवस्थेत गुरे आढळून आले. ट्रक ताब्यात घेत ट्रक मधून 8 वर्ष वयाची 82 हजार रुपये किमतीची 12 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. 5 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरांना सावेर येथील गोशाळेत देखभालीसाठी पाठविण्यात आली आहेत.

याप्रकरणी पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ट्रक चालक मोहम्मद अशरफ कुरसेंद खान, सहचालक मुबारक फारुख खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com