बोगस बियाणे जप्त, कृषी केंद्र मालकासह चौघांवर गुन्हा

बोगस बियाणे जप्त, कृषी केंद्र मालकासह चौघांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दोंडाईचा शहरातील स्टेशन रोड परिसरातील कृषी केंद्रावर काल कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.

एकुण 36 हजारांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी बियाणे उत्पादक कंपनी, कृषी केंद्र चालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बियाणे निरीक्षक योगेश पदमसिंग गिरासे (वय 43) यांच्या फिर्यादीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉम्पले्नसमधील गाळा क्र. 93 मध्ये तपासणी करण्यात आली.

त्यात बोगस एचबीटी कापुस बियाण्यांचा साठा मिळून आला. एकुण 36 हजार 816 रूपयांचे बियाणे जप्त करण्यात आले.

बोगस बियाण्यांचे वितरण व साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतांना मिळून आल्याप्रकरणी बियाणे उत्पादक कंपनी, संबंधीत कंपनीचा मालक व जबाबदार व्यक्ती, श्रीशैलेश वाणी (रा. नंदुरबार) व दोंडाईचातील श्रीनाथ फर्टीलायझर या बियाणे विक्री केंद्राचे मालक कमलेश नारायण कुुंभार (रा.रामी ता. शिंदखेडा) यांच्याविरोधात बियाणे कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिवारी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com