अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तरूण ताब्यात
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

शहरातील पोलिस मुख्यालयात राहणार्‍या 16 वर्षीय मुलीला राकेश उर्फ रिंकू संजय पाटील (वय 25 रा. कालीका देवी नगर, गोळीबार टेकडी रोड, धुळे) याने पळवून नेले होते.

याप्रकरणी मजुरी काम करणार्‍या पिडीत मुलीच्या वडीलांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करत तिला ठाण्यात आणले.

तिची वैद्यकीय तपासणी करून महिला पोलिस उपनिरीक्षकांनी तिची विचारपुस केली. त्यात तिने मला राकेश याने पळवून नेऊन जबरीने अत्याचार केल्याचा जबाब दिला.

त्यावरून गुन्ह्यात वाढीव भादंवि 366 (अ), 376, 377, 354 (ड), अनुसुचीत जाती जमाती कायदा कलम 3 सह लहान मुलांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4, 8 लावण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com