शेवाडेत तरूण शेतकर्‍याचा खून

6 जणांवर गुन्हा
शेवाडेत तरूण शेतकर्‍याचा खून

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शेतातील गाड रस्त्याच्या कारणावरून सळईसह लाथाबुक्यांनी मारहाण करत तरूण शेतकर्‍याचा खून करण्यात आला. ही घटना काल पहाटे शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदु बाबुलाल कोळी (वय 24 रा. शेवाडे) असे मयत तरूणाचे नाव आहे. काल पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास त्याला शेतातील वापरण्यासाठी असलेला गाड रस्त्याच्या कारणावरून शेवाडे शिवारातील शेवंताबाई दगा कोळी यांच्या शेताजवळ सुमित अर्जुन कोळी, रविंद्र जगन्नाथ कोळी, यादव नथा कोळी, जगन यादव कोळी, मगन यादव कोळी व छगन यादव कोळी सर्व (रा. शेवाडे) यांनी गाठले.

रविंद्र याने सळईने त्यांच्या तोंडावर मारले. तर इतरांनी लाथाबुक्यांनी तोंडावर मारून त्याचा खून केला. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले. अशी फिर्याद बाबुलाल मंगा कोळी यांनी शिंदखेडा पोलिसात दिली आहे.

त्यावरून वरील सहा जणांविरोधात भादंवि कलम 302, 341, 143, 17, 148, 427 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक गोटे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com