ठेवीदारांना गंडा, सुरतच्या चौघांसह 11 जणांवर गुन्हा

ठेवीदारांना गंडा, सुरतच्या चौघांसह 11 जणांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कंपनीच्या माध्यमातून दामदुप्पट, आकर्षक प्रलोभने दाखवून सामोडेतील शेतमजुर महिलेसह गावातील अनेक ठेवीदारांना 1 लाख 90 हजार रूपयात गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

याप्रकरणी सुरतच्या चौघांसह 11 जणांवर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यात जिल्हातील इतर हजारो ठेवीदारांकडुन कोट्यावधी रुपयांच्या ठेवी स्विकारल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गुन्हाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

एलआयसीआयएल एलडीएल रीअल लाइफ क्रिएटर इंडीया लि., रिअल लाइफ अ‍ॅग्रो कॅटल प्रा.लि या कंपनीच्या नावाने ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली. कंपनीचे मुख्य प्रतिनिधी म्हणुन काम करणार्‍यांनी सेमीनाराचे आयोजन करून त्यात दामदुप्तटसह विविध आकर्षक प्रलोभने दाखवून साक्री तालुक्यातील सामोडेतून अनेक ग्रामस्थाकडून ठेवी स्विकारल्या.

हप्ता भरण्याची पावती दिली. मात्र ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे न मिळाने या कंपनीने फसवणूक केल्याची ओरड झाली. याबाबत संगिता शगेंद्र याईस (वय 39 रा. सामोडे ता. साक्री) या शेतमजुर महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. तिच्यासह तिचे नातेवाईक व गावातील ठेवीदारांची मुद्दल रक्कम 1 लाख 90 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे.

त्यावरून चंद्रसिंग शिवाज उर्फ शिवाजीभाई चौहाण (रा. ए 963, शुभ एन्केव आगम, व्हीआयपी रोड, वेसू, सुरत), संतोष किसन सपाकाळी (रा. उमरगाव, सुरत), प्रदीप चिंतामण पानपाटील (रा. पर्वत चौरसिया, सुरत), हिरालाल ंशंकर भालेराव (रा. 20, चंद्रलोक सोसाटी पर्वत, सुरत), प्रतिभा देवीदास अहिरे (रा. बाहूबली नगर, धुळे), भैय्या दिलीप अहिरे (रा. पाडळदे ता. धुळे), चंद्रकला संजय खैरनार (रा. वाडीभोकर रोड, धुळे), संगिता दीपक अहिरराव (रा. कल्याणी नगर, धुळे), आशा काशिनाथ व वसईकर (रा. खेमाजी नगर, धुळे), भैयासाहेब यशवंत गुजेला (रा. अनिरूध्द नगर, धुळे), ज्ञानेश्वर शिवदास पाटील (रा. बल्हाणे ता. साक्री) यांच्याविरोधात भादंवि कलम 409, 406, 420, 120 ब, 34 सह एमपीआयडी क 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत बेडाळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com