चोरट्याला अटक, 88 हजारांचा मुद्येमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
चोरट्याला अटक, 88 हजारांचा मुद्येमाल हस्तगत

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अल्पवयीन चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दुचाकीसह 88 हजारांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने काल सायंकाळी शहरातील मच्छिबाजार चौकातील मोहम्मदीया हॉटेल येथून एका विधी संर्घष बालकाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी (वय 22 रा. 80 फुटी रोड, नटराज टॉकीज जवळ, धुळे) याच्यासह तांबे, पितळाची भांडी व सोने- चांदीचे नकाणे गाव व बिलाडी रोड येथुन चोरुन आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 55 हजार 290 रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने, 3 हजार 650 रुपयांचे तांबे, पितळाचे भांडे व 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण 88 हजार 860 रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या मुद्देमालाबाबत देवपुर पोलीस ठाण्यात दि. 19 मे व पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात दि. 22 मे रोजी गुन्हा दाखल आहे. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई सुशांत वळवी, पोहेकाँ रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप थोरात, प्रकाश सोनार, पोना संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com