शेतीच्या वादातून काकांना पाजले विष

पुतण्यावर गुन्हा
शेतीच्या वादातून काकांना पाजले विष

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शेतीच्या बांधाच्या वादातून वृध्द काकांना पुतण्याने पाण्यात विष टाकून पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बाबरे शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर अर्जून मराठे (वय 41 रा. बाबरे) याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.18 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर मराठे यांच्या शेतात त्यांचे वडील अर्जून सजन मराठे (वय 70) हे एकटे बसलेले असतांना त्यांना पाण्याची तहान लागली.

त्यांनी बाजुस असलेला पुतण्या राहुल प्रकाश मराठे (वय 24) याच्या शेतात जावून पिण्याचे पाणी मागितले. मात्र राहुल याने शेताच्या बांधाच्या भांडणाच्या कारणावरून पाण्यात विषारी औषध टाकून ते अर्जून मराठे यांना दिले.

त्याने अर्जून मराठे यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्याच्याविरोधात भादंवि 307, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक कैलास चौधरी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com