चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेला तरूण जेरबंद

एलसीबीची कारवाई, चोरीचे दोन गुन्हे उघडकीस
चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेला तरूण जेरबंद

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील पांझरा काठावरील सिध्देश्वर गणपती मंदिराजवळ चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जिल्हयात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी एलसीबीला सुचना देवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

तपास सुरू असतांना एक इसम सिध्देश्वर गणपती मंदीराजवळील पुलावर चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असून दुचाकी ही चोरीची असल्याचा संशय असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा त्या तरूणाला ताब्यात घेतले.

प्रतिक शिवाजी वारे (वय 20 रा.प्लॉट नं.6, उत्कर्ष कॉलनी, धुळे) असे त्याने त्याचे नाव सांगितले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून दोन 45 हजार रूपये किंमतीच्या हस्तगत करण्यात आल्या असून पश्चिम देवपूर व देवपूर पोलिसात दाखल दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई सुशांत वळवी, योगेश राऊत, पोहेकॉ संदीप थोरात, पोना संतोष हिरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, पोकाँ योगेश जगताप, किशोर पाटील, संजय गुरणे, कैलास महाजन यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com