बोगस बायोडिझेल पंपावर कारवाई

25 लाखांचा मुद्देमाल जप्त
बोगस बायोडिझेल पंपावर कारवाई

धुळे - Dhule :

शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारातील बोगस बायोडिझेल पंपावर शिरपूर तालुका पोलिसांसह पुरवठा विभागाने छापा टाकत आज कारवाई कारवाई केली. बोगस बायो डिझेल पंप सील करुन घटनास्थळावरून तीन वाहनांसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चार जणांविरुद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना बोगस बायो डिझेल पंपासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे यांच्यासोबत दहिवद गाव शिवारात हॉटेल आईसाहेब याच्या पाठीमागे सुरु असलेल्या बोगस बायो डिझेल पंपावर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली. याठिकाणी शासनाची कोणतीही परवानगी अगर लायसन्स नसतांना बायो डिझेलचा साठा करुन विक्री केली जात असल्याचे दिसून आले. या बोगस पंपावरुन २ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीचे ३ हजार १५० लिटर बायोडिझेल, २० हजार रुपये किंमतीचा पंप व साहित्य तसेच दोन ट्रक (क्र. एम.एच.१८ बी आर ५४२० व क्र.एम.एच. १८ एफ १७३)व पिकअप गाडी (क्र. एम.एच.०२ एक्स ए ५५७५) असा एकूण २५ लाख ४६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चंद्रसिंग रजेसिंग राजपूत (वय ३८ रा. दहिवद),रामजीभाई तामलीया (रा. सुरत), प्रकाशसिंग अमरसिंग (रा.सुरत) , मोहनसिंग अजबसिंग राजपूत(रा.वरुळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने यांनी भेट दिली.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई नरेंद्र खैरनार, हेकॉ. लक्ष्मण गवळी, हेमंत पाटील, संजय देवरे, शामसिंग वळवी, पोलीस नाईक संजीव जाधव, अनारसिंग पवार, पोकॉ योगेश दाभाडे, राजीव गिते, गोविंद कोळी, योगेश मोरे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com