अजंग ग्रामपंचायतीत 52 लाखांचा अपहार
श्रीगोंदा जमीन घोटाळा

अजंग ग्रामपंचायतीत 52 लाखांचा अपहार

ग्रामसेविकासह महिला सरपंचावर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

स्वच्छ भारत मिशन या योजनेतंर्गत शासनाकडून आलेल्या निधीचे नियमानुसार वाटप न करता 439 शौचालयांचे काम अपूर्ण ठेवत अजंग/कासविहीर ग्रामपंचायतीत 52 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेसह तत्कालीन महिला सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धुळे तालुका पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी भगवान वाल्मीक पाटील (वय 54 रा.प्लॉट नं.37 सुर्यानगर,वलवाडी शिवार,देवपूर, धुळे) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार त्यांनी सन 2016 ते 2018 या काळात तत्कालीन सरपंच भिमाबाई पुंडलीक भदाणे आणि ग्रामसेविका सारीका प्रल्हादसिंग परदेशी यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतंर्गत शासनाकडून आलेल्या निधीचे नियमानुसार वाटप न करता 439 शौचालयांचे 52 लाख 68 हजार रूपये अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असतांना देखील स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रेखा क्रिएटर्स या खाजगी ठेकेदाराच्या खात्यावर जमा करुन अधिकारांचा दुरुपयोग केला.

चौकशीत हा अपहर समोर आला. अपहार करून शासनाची फसवूणक केल्याप्रकरणी दोघांवर भादंवि 406,409, 420, 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एस.काळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com