धुळ्यात ट्रकसह 15 लाखांचा गुटखा जप्त

मोहाडी पोलिसांची कारवाई
धुळ्यात ट्रकसह 15 लाखांचा गुटखा जप्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मध्यप्रदेशातील इंदूरहून पुण्याकडे होणारी गुटख्याची तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली. आज पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावर आयशरसह 15 लाखांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला. वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही अन्न व औषध प्रशासन करीत आहेे.

इंदूर येथून धुळेमार्गे पुण्याकडे एका ट्रकमधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना मिळाली.

त्यानुसार, त्यांच्यासह पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसीडेन्सीजवळ सापळा लावला. पहाटे साडेचार वाजता ट्रक (क्र.एम.पी.09 जी.एफ.6028) चाळीसगाव चौफुलीकडून येतांना दिसताच पोलिसांनी ट्रकला रस्त्याच्या कडेला थांबविण्याचा इशारा केला. ट्रक थांबल्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली.

ताडपत्री उचकवून पाहिली असता 20 गोणपाटाचे मोठे पोते दिसून आले. त्यातील एका पोत्यात 8 प्लास्टीक पिशव्यांमध्ये विमल गुटख्याचे 52 पाऊच होते.

एकूण 9 लाख 15 हजार 200 रुपयांचा गुटखा व 6 लाखांचा आयशर ट्रक असा एकूण 15 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी चालक गजेंद्रसिंह भवानीशंकर वर्मा (वय 43 रा.धतुदा ता.महू जि.इंदौर) याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक चिमन्य पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजगुरू, साळुंखे, पोकॉ हरिश्चंद्र लोंढे, पाटील यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com