धुळ्यानजीक दीड कोटी रुपयांचा गुटखा व वाहने जप्त

तीन जणांना अटक, स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाची कारवाई
धुळ्यानजीक दीड कोटी रुपयांचा गुटखा व वाहने जप्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक नागपूर-सुरत महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने दोन कारवाईत एक कोटी 37 लाख 28 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला विमल नावाचा पानमसाला गुटखा व तीन वाहने 15 लाख किंमतीचे असा एकुण एक कोटी 52 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

परराज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पानमसाल्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाली.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कर्मचार्‍यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार दि.12 मे रोजी रात्री आयशर (वाहन क्रमांक एम.एच-48 बी.एम. 3717) आणि आयशर (वाहन क्र.एम.एच-48 ए.जी. 3718) हे धुळे-साक्री रोडवरील सुरत बायपासजवळील महेंद्र हॉटेल जवळ उभे होते. दोन्ही वाहनांची पथकाने तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित असलेला विमल नावाचा पानमसाला गुटखा आढळून आला. सदर वाहनाचे चालक महेंद्र रामनवल तिवारी, रा.कल्याणपूर (उत्तरप्रदेश) व प्रमोद जटाशंकर उपाध्याय, रा.नयापूर, (उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले.

प्रत्येकी 45 लाख 76 हजार किंमतीचा विमल नावाचा पानमसाला गुटखा व आयशर पाच लाख किंमतीची जप्त करण्यात आली. तसेच आज दि.13 मे रोजी धुळे-साक्री रोडवरील नेर गावाजवळील बच्छराज हॉटेल समोर उभे असलेली आयशर क्र.एम.एच. 48 ए.वाय./3929 चा चालक गोवर्धन जंगीलाल गौड, रा. नरहन (उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. वाहनातील मालाची तपासणी केली असता, सदर वाहनातही प्रतिबंधित असलेला विमल नावाचा पानमसाला गुटखा आढळुन आला. 45 लाख 76 हजार किंमतीचा विमल नावाचा पानमसाला गुटखा व 5 लाख किंमतीची आयशर ताब्यात घेण्यात आले.

तीनही कारवाईमध्ये एक कोटी 37 लाख 28 हजार रुपये किंमतीचा गुटखा व तीन वाहने 15 लाख किंमतीचे असा एकुण एक कोटी 52 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल अन्न व औषध प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात आला.

सदर कारवाई पोनि. शिवाजी बुधवंत, पोसई.सुशांत वळवी, पोसई योगेश राऊत, पोहेकॉ. श्रीकांत पाटील, संदीप थोरात, सुनिल विंचुरकर, रफीक पठाण, महेंद्र कापुरे, संजय पाटील, पोना.संदीप पाटील, रविद्र माळी, संतोष हिरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, अशोक पाटील, गौतम सपकाळे, हेमंत सोनवणे, मनोज पाटील, चेतन कंखरे, उमेश पवार, विशाल पाटील, राहुल सानप, रवि राठोड, मनेज बागुल, महेश मराठे, तुषार पाटील, शैलश जाधव, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com