रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने 16 लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने 16 लाखांचा गंडा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एकाला 16 लाखांत गंडा घातल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील तिघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नरेंद्र सदाशिव नेरकर (वय 55 रा.लोणखेडी) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने भावराव सदाशिव नेरकर (रा.तळेगाव), शांताराम विठ्ठल सपकाळ, सौ.आशा शांताराम सपकाळ तिघे (रा.भोसरी, पुणे) यांनी फिर्यादीकडून 16 लाख रुपये घेतले.मात्र नोकरी लावून दिली नाही.

डिसेंबर 2018 मध्ये ही रक्कम घेण्यात आली होती. याप्रकरणी वरील तिघांवर भादंवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com