पोलिस, होमगार्डच्या अंगावर वाहन घालून बॅरिकेट्स तोडले

8 जणांवर गुन्हा, 2 ताब्यात
पोलिस, होमगार्डच्या अंगावर वाहन घालून बॅरिकेट्स तोडले

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील अजनाळे बॉर्डर पाईंटवर पोलिस आणि होमगार्डच्या अंगावर वाहन घालुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत बॅरिकेटस् तोडणार्‍या दोन पीकअप वाहनांवरील आठ जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोकॉ अतूल पवार यांच्यासह होमगार्ड कर्मचार्‍यारी हे अजनाडे बॉर्डर सिलिंग पाईंट येथे ड्युटीवर होते. काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी दोन पिकअप (क्र. एम.एच.41 जी.2628 व क्र. एम.एच.41 ए.जी.575) वाहनांना थांबण्याचा इशारा दिला.

तेव्हा चालकांनी त्यांच्या ताब्यातील वाहने त्यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पो.कॉ.पवार आणि होमगार्ड बचावले. मात्र बॅरिकेट्स तुटले. या पिकअप वाहनांमधून कत्तलीसाठी गुरांची निदर्यपणे वाहतूक केली जात होती. ही गुरे जहागिर (रा.नवापूर) याच्याकडून घेवून मालेगावकडे नेली जात होती.

याप्रकरणी पोकाँ पवार यांच्या फिर्यादीवरून आसिफ खान, अकलाख अहेमद मोहम्मद आक्रम, रहिम शेख, सलमान, झहीर सर्व (रा. मालेगाव), जहागीर (रा. नवापूर) व इतर तीन जण अशा एकुण आठ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आसिफ खान आणि अकलाख अहेमद या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com