बाम्हणेतील घरफोडीची उकल

6 लाखांच्या मुद्देमालासह चोरटा जाळ्यात
बाम्हणेतील घरफोडीची उकल

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे झालेल्या धाडसी घरफोडीची उकल करण्यास दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 6 लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बाम्हणे येथील रहिवासी गुलाबराव आत्माराम सोनवणे यांच्याकडे 15 ते 16 जानेवारी रोजी दरम्यान रात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. घरातून तब्बल 7 लाख 2 हजार 177 रूपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिने लंपास केले होते. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असतांना शिंदखेडा येथील पवन कोमलसिंग गिरासे याने ही चोरी केल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल त्याला अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्यमालाची माहिती दिली. त्यानुसार त्यांच्याकडून 6 लाख 2 हजार 800 रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व 25 हजारांची दुचाकी असा एकुण 6 लाख 27 हजार 800 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यकक पोलीस निरिक्षक संतोष लोले करित आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, सचिन गायकवाड, पोना संदीप कदम, योगेश पाटील, मुकेश अहिरे, राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com