धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात नव्याने नऊ करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 14 हजार 416 वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 13 हजार 882 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील 129 अहवालांपैकी 7, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 14 अहवालांपैकी 1, भाडणे ता. साक्री सीसीसी मधील 12 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व 28 अहवाल, भाडणेतील रॅपिड अँटीजन टेस्ट मधील 3 अहवाल, महापालिका रॅपिड अँटीजन टेस्ट मधील 166 अहवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील 13 अहवाल निगेटिव्ह आले आहे.