धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बँक बंद ठेवण्यात आली आहे.

पुढील सूचना प्राप्त होईल पर्यंत कामकाज बंद राहिल. ग्राहकांनी जवळच्या शाखेतून व्यवहार करावेत, अशी विनंती करणारा फलक बँकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात करोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी बाधितांचा आकडा 14 हजार 310 इतका झाला आहे. तर आता पर्यंत 385 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

यात धुळे शहरातील बाधितांचा संख्या सहा हजार 733 तर मृतांची संख्या 171 इतकी आहे. रविवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये स्टेट बँकेतील एका कर्मचार्याचा समावेश आहे.

यामुळे या मुख्य शाखेतील कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे. तर सोमवारी 24 तासात जिल्ह्यात 20 रूग्ण आढळले आहेत.