धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील शांतीनगरातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला तर गुरुवारी 24 तासात 12 रुग्ण आढळून आले आहेत.

बाधितांची संख्या घटत असली तरी करोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधीत शांतीनगर येथील 65 वर्षीय महिला उपचार घेत होती.

उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत करोनाने जिल्ह्यात 381 जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 169 तर ग्रामीण भागात 212 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात 12 बाधित आढळून आले आहेत. बाधितांची संख्या 14 हजार 102 पोहचली आहे.