धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटत असून मंगळवारी दिवसभरात केवळ 10 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 13 हजार 835 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 13 हजार 13 हजार 300 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील 338 अहवालांपैकी मधुकामिनी अपार्टमेंट 1, साक्री रोडवरील 1 असे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 29 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व 159 निगेटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व 184 अहवाल निगेटिव्ह आले आहे. भाडणे ता. साक्री सीसीसीमधील सर्व 296 अहवाल निगेटिव्ह आले आहे. महानगरपालिका पॉलिकेक्निकमधील 135 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व 10 अहवाल निगेटिव्ह आले आहे. खाजगी लॅबमधील 7 पैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

त्यात अरुणकुमार वैद्य नगर 2, शासकीय दूध डेअरी वसाहत 1, जैताणे ता. साक्री1 व चिमठाणे एका अहवालाचा समावेश आहे.