आणखी 162 पॉझिटिव्ह रूग्ण
धुळे

आणखी 162 पॉझिटिव्ह रूग्ण

एकुण रूग्ण संख्या 6 हजार 517

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 162 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोंडाईचातील 75 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष व धुळे शहरातील चित्तोड रोडवरील 56 वर्षीय पुरूषाचा कोरोने मृत्यू झाला आहे.

जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 6 हजार 517 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा दोनशेवर पोहोचला आहे.जिल्हा रूग्णालयातील 161 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते पाचही एसआपीएफचे जवान आहेत.

दोडाईचा उपजिल्हा रूग्णालयातील 97 अहवालांपैकी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. भाडणे ता. साक्रातील सीसीसी केंद्रातील 94 अहवालांपैकी 47 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

महापालिका पॉलेटेक्नीक सीसीसीमधील 24 पैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खाजगी लॅबमधील 137 अहवालांपैकी 51 पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 6 हजार 517 वर पोहोचली आहेत. तर आतापर्यंत एकुण 200 जणांचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com