जिल्ह्यात बाधितांची संख्या 6 हजार पार
धुळे

जिल्ह्यात बाधितांची संख्या 6 हजार पार

नव्याने 151 पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात 21 वर्षाच्या तरुणासह 80 वर्षाच्या वृध्दाचा समावेश आहे.

तर नव्याने 151 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6 हजार 355 इतकी झाली आहे.

मृतांमध्ये पुरुष 21 वर्ष जुनापाणी शिरपूर, स्त्री 80 वर्ष पिंपळनेर, पुरुष 72 वर्ष बोरीस, स्त्री 65 वर्ष पिंपळनेर, स्त्री 60 वर्ष शिरपूर, पुरुष 60 वर्ष चितोड रोड धुळे, पुरुष 74 वर्ष भोई सोसायटी धुळे आणि पुरुष 56 वर्ष जमनालाल बजाजरोड धुळे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 197 इतकी झाली आहे. यात शहरातील 93 तर ग्रामीण भागातील 104 रुग्णांचा समावेश आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या 151 रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील 28, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील तीन, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 22, धुळे पॉलिटेक्निक कोविड सेंटरमधील 41, वैद्यकीय महाविद्यालयातील 12 आणि खासगी लॅबमधील 45 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेवून प्रशासनाने अधिक सक्त नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विना मास्क फिरणार्‍यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी दिले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com