जिल्ह्यात 251 नवे रुग्ण
धुळे

जिल्ह्यात 251 नवे रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज एकाच दिवशी करोनाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 251 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6 हजार 203 आणि मृतांची संख्या 188 इतकी झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान 60 वर्षीय पुरुष (सुलवाडे ता. शिंदखेडा), 36 वर्षीय महिला वाठोडा (ता. शिरपूर), 65 वर्षीय पुरुष साक्री मेनरोड, 65 वर्षीय पुरुष देवभाने (ता.धुळे), 55 वर्षीय पुरुष मोहाडी, धुळे, 74 वर्षीय पुरुष सोनगीर (ता.धुळे) व खाजगी हॉस्पिटलमध्ये 74 वर्षीय पुरुष (रा. देवपूर, धुळे) या करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात खाजगी लॅबमधील 133 अहवालापैकी 64 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात तीन, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात 65, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात 35, साक्री तालुक्यातील भाडणे कोविड सेंंटरमध्ये 48, धुळ्यातील पॉलिटेक्निक सेंटरमधील 21 तर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात 15 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

दिवसभरात 251 नवीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा सहा हजारांचा टप्पा पार करीत 6 हजार 203 इतका झाला आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेवून प्रशासनाने आता अधिक गांभीर्याने नियमांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com