जिल्ह्याची करोनामुक्तीकडे वाटचाल

जिल्ह्याची करोनामुक्तीकडे वाटचाल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी एकही करोना रूग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्याची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे.

तब्बल चौथ्यांदा जिल्ह्यात शुन्य रुग्ण संख्या आढळली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 488 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 41 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 668 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 261 तर ग्रामीण भागात 407 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वतः स्वतःची काळजी घेतली. व गर्दी केली नाही तर जिल्ह्या कोरोना मुक्त नक्कीच होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com