जिल्ह्यात मृत्यूदर घटला

शनिवारी आढळले तीन करोना रुग्ण
जिल्ह्यात मृत्यूदर घटला

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात काही दिवसांपासून मृत्यूदर घटला असून शनिवारी 24 तासात फक्त तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या करोना लाटेत आतापर्यंत 668 जणांचा बळी गेला आहे. दुसरी लाट ओसरत असतांना मृत्यूदर मात्र घटला आहे. ही समाधानाची बाब आहे.

शनिवारी 24 तासात जिल्ह्यात फक्त तीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या 42 हजार 471 वर पोहचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com