कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना न्याय हक्क मिळवून द्या !

कृती दलाच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांची अपेक्षा
कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना न्याय हक्क मिळवून द्या !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांची यथायोग्य संगोपन व्हावे अशी अपेक्षा आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केली.

कृती दलाची बैठक आज आयुक्त शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाने, अग्रणी बँक शाखा व्यवस्थापक एम.के.दास, कक्ष प्रबंधक आशुतोष पुरकर, उपायुक्त शिल्पा नाईक, डॉ. महेश मोरे, जिल्हा बाल संरक्षण समन्वयेक तृप्ती पाटील, मनपा प्रकल्प अधिकारी गणेश खोंडे, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ आदी उपस्थित होते.

बैठकीत पालक गमावलेल्या बालकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे, शाळा, महाविद्यालय फी मध्ये सवलत, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देणे, बचत गट व रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे, त्यांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेवून देणे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

बालकांना लाभ मिळवून देण्यासाठी क्षमतेने समितीने कार्यरत राहून गतीने कारवाई करावी, अशी सूचना आयुक्तांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com