जिल्ह्यात 13 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 13 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्याची करोना मुक्ततेकडे वाटचाल सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात केवळ 13 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 42 हजार 343 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 41 हजार 325 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्हा रूग्णालयातील 90 अहवालांपैकी 2, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 122 पैकी 0, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 15 पैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 10 पैकी 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 241 पैकी 1, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 10 पैकी 0, रॅपिड टेस्टचे 206 पैकी केवळ 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 60 पैकी 0, मनपा सीसीसी 20पैकी 1, मनपा युपीएचसी 426 पैकी 0, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 28 पैकी 2, एसीपीएम लॅबमधील 11 पैकी 4 व खाजगी लॅबमधील 12 पैकी 0 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com