जिल्ह्यात 11 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 11 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या चांगलीच घटली असून बुधवारी दिवसभरात केवळ 11 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 42 हजार 316 इतकी झाली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 85 अहवालांपैकी 1, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 133 पैकी 3, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 73 पैकी 0 पॉझिटिव्ह आला आहे.

तर उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 15 पैकी 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 225 पैकी 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 15 पैकी 1, रॅपिड टेस्टचे 157 पैकी केवळ 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 171 पैकी 0, मनपा सीसीसी 33 पैकी 0, मनपा युपीएचसी 559 पैकी 0, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 53 पैकी 0, एसीपीएम लॅबमधील 21 पैकी 2 व खाजगी लॅबमधील 27 पैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com