नव्याने 141; जिल्हा कारागृहात 23 करोना रुग्ण

नव्याने 141; जिल्हा कारागृहात 23 करोना रुग्ण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील जिल्हा कारागृहात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आज नव्याने 141 रुग्ण बाधीत झाले आहेत. आतापर्यंत...

दहा हजार 500 बाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालय येथील 20, दोंडाइचा येथील उपजिल्हा रुग्णालयातील सात, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 38, भाडणे साक्री सीसीसीमधील रॅपीड एंटीजन टेस्टमध्ये 17, महापालिका पॉलिटेक्निक येथील 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ, खासगी लॅबमधील 18 असे एकूण 141 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

शहरातील जिल्हा कारागृहात 23 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कारागृह सील करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार 500 बाधीत आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू

धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे धुळे येथील पारोळा रोडवरील 69 वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात उपचार घेणारे मुकटी येथील 45 वर्षीय पुरुष, साक्री रोडवरील महावीर कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, थाळनेर येथील 52 वर्षीय पुरुष, पारिजात कॉलनीतील 62 वर्षीय महिला, रोहाणे येथील 71 वर्षीय पुरुष आणि जुने धुळ्यातील सुभाष नगरातील 60 वर्षीय पुरुष यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 315 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 145 आणि ग्रामीण भागात 170 रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार

खासगी हॉस्पीटलमधील मागच्या दिनांकाचे मृत्यूची माहिती आज देण्यात आली असली तरी त्या सर्व मृतांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमानुसारच करण्यात आले आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com