धुळे जिल्ह्यात 88 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 88 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 88 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 41 हजार 823 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 40 हजार 46 रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्हा रूग्णालयातील 168 अहवालांपैकी 11, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 9, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 6, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 0, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 2, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 2, रॅपिड टेस्टचे 15 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 3, मनपा सीसीसी 1, मनपा युपीएचसी 14, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 7, एसीपीएम लॅबमधील 9 व खाजगी लॅबमधील 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com