जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात केवळ 103 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 41 हजार 567 वर पोहोचली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 119 अहवालांपैकी 15, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 7, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 1, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 1, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 5, भाडणे ता. साक्री सीसीसी 1, रॅपिड टेस्टचे 21 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 1, मनपा सीसीसी 1, मनपा युपीएचसी 32, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2, एसीपीएम लॅबमधील 7 व खाजगी लॅबमधील 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com