शहरातील 60 व्यापारी ताब्यात; नंतर सुटका, दंड वसूल

डीवायएसपी दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख फौजफाट्यासह उतरले रस्त्यावर
शहरातील 60 व्यापारी ताब्यात; नंतर सुटका, दंड वसूल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

ब्रेक द चेन आदेशाचे पालन न करणार्‍या शहरातील 28 दुकानदारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 22 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर विना मास्क फिरणार्‍यांविरुध्द 231 केसेस करुन 26 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे शहर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी दिली आहे.

दरम्यान 60 व्यापार्‍यांना ताब्यात घेवून त्यांची नंतर सुटका करण्यात आली. तर काही जणांवर दंडात्मक कारवाई केली.

जिल्ह्यात करोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी ब्रेक द चेन निर्देश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये, मास्कचा नियमित वापर करावा, सोशन डिस्टस्निगंचे पालन करीत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना कामकाजाची वेळ ठरवून दिली आहे. त्यानंतरही नागरिक विनामास्क आणि विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहेत. याशिवाय काही आस्थापना, नागरिक शासनाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे.

धुळे शहर उपविभागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक आस्थापना वगळता इतर आस्थापना, हॉटेल, सट्टा, जुगार यांचेवर कारवाई करण्यात येवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 28 दुकान, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन 22 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विना मास्क फिरणार्‍यांवर 231 केसेस करण्यात येवून 26 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विना कारण रस्त्यावर फिरणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 235 वाहन चालक, सट्टा, जुगार यांच्यावर केसेस करण्यात आल्या आहेत. गरुड कॉम्प्लेक्स, आग्रारोड, बारपत्थर, फुलवाला चौक, झाशी राणी पुतळा चौक आदी भागात गस्त घालून सुमारे 60 पेक्षा जास्त दुकानदारांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका केली. यात मोबाईल विक्री व दुरुस्ती, हार्डवेअर, कपडे विक्रेते, इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने यांचा समावेश होता.

26 हजारांचा दंड

शासनाच्या आदेशाचे भंग केल्यामुळे 17 दुकानदारांवर भादंवि 188, 269 व इतर कायद्यान्वेय गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच 28 दुकान, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करुन 22 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणार्‍या 231 जणांकडून 26 हजार 200 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. विनाकारण फिरणारे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे 235 वाहन चालकांना मोटार वाहन कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गर्दीच गर्दी...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे गर्दीवर निर्बंध आणले आहेत. दुकाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तरी देखील गर्दी होत आहे. दुकाने सुरु ठेवली जात आहे. त्यामुळे आज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

50 जणांची अँटिजन टेस्ट

शहरात लॉकडाऊन असतांना सर्रासपणे काही जण रस्त्यावर फिरतात. शहरातील पेठ भाग, देवपूर, साक्रीरोड, मालेगाव रोड, बारापत्थर आदी भागात आज डीवायएसपी दिनकर पिंगळे यांनी विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली. त्यांची जागेवरच अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात सुदैवाने कोणीही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. यापुढेही विनाकारण फिरणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

-दिनकर पिंगळे, डीवायएसपी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com